माझी पाने..



Monday, February 28, 2011

लग्नानंतर....!!! (TP कविता)

लग्नानंतर बघा कशी ही Life घेते पूर्ण Twist
कवितेच्याही वाहित सापडते, या महिन्याची किराणा लिस्ट..

लग्नानंतर रोज ऐकणे, "तू पूर्वीसारखा राहिला नाही"
तूही होतीस पूर्वीच सुंदर, फरक तिने हा पहिला नाही

सायंकाळी नियम्बद्धाशी, न चुकाणारी रोजची कटकट
दुर्लक्षितशी सुरु राहते, अखंड, अनंत सदैव वटवट

टोमणे झाले मित्र मला, घराणे झाले शिव्यान्ना जागा
उद्धरले तू सर्व कुळान्ना, अखेरीस मी तुलाच त्रागा...

नेहमीच माझी सत्व परीक्षा, परस्त्रीवरुनी अन् ऑफिसमध्ये
कोण राम अन कोण ही सीता, रामच जळतो अग्निमध्ये....

तूच म्हणाली कर ना कविता, सख्या कधी तू माझ्या वर..
म्हणुन सांगतो ऐक प्रिये... आणि "जा चहा कर...!!!!"

पहिली मैत्रीण

अजून ही मला खर वाटत नाही
ती नाहीये हे मनास पटत नाही

आता काल-परवा पर्यंत ती होती
माझ्या अवती-भवती दरवळत
एखाद्या उमळत्या कळीप्रमाणे
मनात भिनलेली कळत-नकळत

ती होतीच तितकी सुंदर
कानात अजूनही आहेत तिचे बोल
तिची साथ म्हणजे जणू इंद्रधनू
प्रत्येक रंग त्याचा होता अनमोल

तिच हसण तिच असण
हे किती सुखद असायच
गोजिर्‍या गाली तिच्या
फूल पाखरू हसायच

तिचे श्वास हेच माझे आयुष्य
तिच्याविना मी कुठे जगत होतो
सुखाच्या सागरी निजाव तिने
हेच देवाकडे मागण मागत होतो

पण ती खरच एक कळी होती
कळीच आयुष्य ते केवढ
मूठभर पाणी हाती घेऊन
ती उघडल्यावर राहील तेवढ

चिमुकल्या हातांनी जन्म भराच्या
आठवणी देऊन गेली आहे
प्राण माझे ही घेऊन गेली
शरीर फक्त ठेऊन गेली आहे

वेडं मन

जाता जाता आठवण म्हणून
डोळ्यांत अश्रू तू देऊन गेलास
माझ्या मनाला माझ्यापासूनच
परकं करून गेलास

रुसले हे मन माझे
माझाशी आज बोलत नाही
तू न माझा राहिलास
हे त्या वेड्याला पटत नाही

कितीही समजावले तरी
माझे तो मानतच नाही
तुझ्याच विचारात राहतो
माझे दु:ख त्याला कळतच नाही

वेडं हे मन माझे
तुझी वाट पाहणं सोडत नाही
तू परत कधीच येणार नाही
कदाचित त्याच्या मनालाही हे पटत नाही

पहिला पाउस...पहिलं प्रेम..

एक दुपार अशीच
सरत्या मे महिन्याची
मी खिडकीपाशी वाचत बसलेले
इतक्यात चाहूल लागली पावसाची

हवेत आलेल्या गारव्याने
उन्हाची काहिली ओसरली
तळपणार्या सूर्याची
कृष्ण्मेघांनी चांगलीच जिरवली

सोसाट्याचा वारा सुटला
बटांशी माझ्या खेळू लागला
त्या अलवार स्पर्शात
त्याचा भास झाला

बघता बघता
जलधारा बरसू लागल्या
टपोर्या थेंबांनी
धरती भिजवू लागल्या

झाडपान रस्त्यासोबत
त्यांनी हवेलाही नाही सोडलं
उरात दडवलेल्या आठवणींना
हलक्या सरींनी जागवल

नकळत हातातल पुस्तक मिटल
मन भूतकाळात हरवल
ओल्या मृदगंधासोबत
आठवणींच अत्तर दरवळल

पहिल्या पावसाच
हेच तर अप्रूप असत
पहिल्या प्रेमाशी त्याच
खूप जवळच नात असत

म्हणूनच मुली मला आवडत नाहीत

मैत्रीसाठी जीव देतात
कटू घटना सोडून देतात
मुलांपासून हे शिकत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत

हेवा, असूया ओसंडून वाहे
एकमेकींना पाण्यात पाहतात
जय वीरू सम उदाहरणे नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत

बाहेरचे तर सोडून द्या हो
घरामधे ही या असेच करतात
उखाळ्या पाखाळ्या थांबवत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत

मुलं बोलली कि या भाव खातात
नाही बोलली कि नावे ठेवतात
विक्षिप्तपणा काही सोडत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत

मनात एक आणि ओठावर एक
टोमण्यातून बोलणे असते
म्हणणे यांचे सरळ सांगत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत

कशास उगारता बोटं कुणावर
केलय का आत्मपरीक्षण सत्वर
एकमेकींना आधार देत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत

क्षण असे...क्षण तसे...!

कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे...!
मुठीत मिटावे आर्त आकाश,नि विझवून टाकावेत तप्त तारे...
दूर लोटावा खिडकीतला चंद्र आणि फुंकून द्यावेत वेडे वारे...
कोंडावे स्वतःतच स्वतःला, बंद करून मनस्वी मनाची दारे ..
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे...!

कित्येक क्षण असे येतात, की अनोळखी वाटतात सगळेच चेहरे...
सांगावे गाऱ्हाणे कुणाला, जेव्हा आपलेच होतात बर्फ,बधीर, बहिरे...
सकाळी मिरवलेल्या जखमांचे, रात्री छळतात जेव्हा तीव्र शहारे..
नको वाटते मलमपट्टी,चालतील काटे आतवर सलणारे गर्द गहिरे..
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे...!

कित्येक क्षण असे येतात, की समजत नाही, काय वाईट,काय बरे...
आपणच बांधलेल्या नीतीतत्वांच्या समाधीचे जेव्हा ढासळतात चिरे..
निराशेचे कल्लोळ मनात आणि आटून जातात इच्छेचे झरे...
कशासाठी जगायचे?....इथे कशाचेच नाही काही खरे...
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे...!

पण एखादा क्षण असाही येतो की, उठून ताठ उभे राहतात ढासळणारे...
पारंबीचे दोरही जिद्दीने सावरतात, कधीकधी वटवृक्ष कोसळणारे...
असा एखादा क्षणीक स्पर्श, शांत करतो त्रस्त जीव तळमळणारे..
असा एखादा क्षणीक शब्द, तोलून धरतो अवघे आयुष्य डळमळणारे...
अशा एखाद्या क्षणावरच जगतात माणसे, असे कित्येक क्षण मरणारे..!

आरसा मनाचा..

माझं मन , मनाचा आरसा
आरश्यात प्रतिबिंब, माझंच का?

चंचल मन . बदलणार मन
असाच बदलणारा आरसा मन

बदलत्या आरश्यात बदलतं रूप
माझचं मला भासे अनोळखी रूप

काळोख्या काजळरातिचं अन कधी
लक्ख सूर्य प्रकाशातलं तर कधी
संध्याछायेतलं, सतत बदलतं ...
माझचं का हे रूप? माझचं हें रूप ....

आता आरशालाही झाली आहे सवय
बदलत्या रुपांना न्याहळायाची ,
साठवून ठेवून मग............
नको तेव्हा नको ते दाखवायची .

माझे पहिले प्रेम

माझे पहिले प्रेम म्हनजे
जनु पोरकटपनाच होता
पन त्या दिवसामधला
त्याचा रंगच भारी होता

प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची पावले पडत होती
पन त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती

पहिल्या वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्यापेक्शा दुसरी सुंदर नसेल
अशी शंका येउन गेली

काही दिवसातच दोघांची
नजरानजर झाली
तिच्या एका नजरेने
आमची छाती धडकुन गेली

काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे पसरत गेली
मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ?

रात्र रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेमपत्रे लिहित होतो
होकार मिळेल की नकार
एवढाच फ़क्त विचार करीत होतो

करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही प्रेमपत्र दिले
मित्रानी तेव्हा सांगितले
आता तुझे नही खरे

तेव्हा कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत
मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र जुने आहे

आम्हाला आवडलेली रानी
नेहमी दुसरय़ाचीच असते
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते

प्रेम व्यक्त करत नाही

प्रेम व्यक्त करत नाहीस
नुसते सुचक बोलत राहतेस
पण प्रेम व्यक्त करत नाहीस
मी बोलायची वाट पाहतेस
स्वता काही बोलत नाहीस

माझ्यावर प्रेम करतेस तर
सान्गत का नाहीस एकदा मला
माझ मन जाणतेस तरी
कसली भीती वाटते तुला

sms अगदी प्रेमळ लिहीतेस
आणि म्हणतेस फ़क्त मेत्री आहे
पण खर काही वेगळच आहे
याची मला पुर्ण खात्री आहे

आता सोड ना हे लाजण तुझ
अन हाक दे माझ्या प्रेमाला
मनातले शब्द मनातच ठेवतेस
का छळतेस अशी सान्ग मला

ती चालली होती

ती चालली होती, एकटीच तिच्या वाटेने
कुणाचीतरी सोबत मिळेल या वेडया आशेने

तसा डोक्यावरचा सुर्य होताच तिच्या साथीला
जणु तो साथ देत होता तिच्या संथ गतीला

तिला भान न होते तिच्याही अस्तित्वाचे
चटकेही लागत नव्हते पाया खालच्या विस्तवाचे

अचानक डोक्यावरचा सुर्य ढगाआड जाउ लागला
भर दिवसा हवेत मंद वारा वाहु लागला

तिच्या शांत चेहरयावर हसु उमटले
गुढ प्रकृतीचे जणु फक्त तिलाच उमगले

आतुर होऊन ती ढगाकडे पाहु लागली
पावसाच्या नुसत्या कल्पनेने ती प्रफ़ुल्लीत होऊ लागली

तिला वाटल पावसाच्या आगणित सरी तिच्यावर कोसळणार
अन.. मतीचा सुगंध तिच्या श्वासात मिसळानार

पन....तो मात्र तिला नुसतीच आशा दाखऊन परतला
ढगाआड लपलेला सुर्य गालतल्या गालत हसला

डोळयातुन तिच्या पाण्याचे अनेक थेंब ओघळले
त्या थेंबाणी मुळे जनु सारे आसमंत उजळले

ती शुन्य नजरेने तिच्या वाटेकडे पाहु लागली
थकलेली पाऊले पुन्हा ऊचलु लागली

अन...ति पुन्हा एकटिच चालु लागली

मी अन तू

ते आकाश मी
ही जमीन तू
हृदयाची आशा मी
श्वासाची परिभाषा तू

सावळा मेघ मी
कडाडती वीज तू
बरसनारा ढग मी
सरसरनारी सर तू

फूलनारा मोगरा मी
दरवळणारा गंध तू
सळसळणारा वारा मी
खळखळणारी सरिता तू

पहाटेच धुक मी
धुक्याला ओलवनारा दव तू
मी..तू अन तू... मी

मला प्रेमात पडायचय

अमावस्या रात्री मला चांदन पहायचय
आयुष्याच्या या वळनावर मला प्रेमात पडायचय !!

कधी खुदकन हसणारी, कधी माझ्याकड़े बघून हसणारी
कधी गाल फुगवून बसणारी
अशी वेड़ी शोधायची, दिवसभर तिला बघायचय
मला प्रेमात पडायचय !!

उगवनारा रवि का पोर्णिमेचा चन्द्र,
टपरिताला कटिंग का CSD मधली Coffee,
जोशिंचा वड़ा का Dominio's मधला Pizza,
तिला समजयाचय , मला प्रेमात पडायचय !!

उड़नाऱ्या ओढनिचा ओझरता स्पर्ष अनुभावयाचय
गुलाबी ओठातून माझे नाव एकायचे,
स्पर्शाने गुलाबी होणारे तिचे गाल, ती नजर स्म्रुतीत कैद करायाचीय
मला प्रेमात पडायचय !!

धो धो पढ़नाऱ्या पावसात, तिच्या छत्रीचा आसरा शोधयाचाय
माझ्या हृदायस्त मंदिरात, एक मूर्ति उभारायचीय
मला हे जग विसरायचय,
मला प्रेमात पडायचय !!

विचारांच सौदर्य जिच्या अंगी,
संस्काराचे लेने जिच्या ठायी,
अमृतासम गोड जिची वाणी, सादगी हाच स्वाभाव,
असे एक मोहक चित्र साकारायचाय,
मला प्रेमात पडायचय !

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही.

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही…

का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण…

मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही…

रात्री छान च असतात … तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला…

प्रेम कधी सफल होते तर कधी नाही… ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असत…

प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही …
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही

परवा भेटला बाप्पा

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक

इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?

असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप


मी हसले उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं
'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं '
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं'

'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव'
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव '
'देशील आणून परत माझी हरवलेली नाती '
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती '

'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं '
'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं '
'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर '
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार '

'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान'
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?
तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा "सुखी रहा" म्हणाला

मैत्री

जसं अतूट नातं असतं
पाऊस आणि छत्रीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

अंगरख्याच्या आत असतं
मुलायम अस्तर जरीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं हळुवार बंधन असतं
श्रावणाशी सरीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं नातं लाटांचं
किना-याशी खात्रीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

प्रेमाची फूल

तुला देण्यासाठी आणली फूले
द्यायचीच राहून गेली
तुझ्या आठवणीं सारखी
वही मध्येच बंद होउन गेली

फुलांचा जीव गुदमरेल
म्हणून वही उघडून बघतो
त्या कारणाने तुझ्या आठवणीत
थोडा का होइना जगुन बघतो

फूले आपला रंग वास
वहीच्या पानाला देऊन जातात
त्यागात पण प्रेम असते
हे सत्य सांगुन जातात

वहीच्या पानात फूले सुकल्यावर
काही खुणा देऊन जातात
तुझ्या आठवणींच्या जखमा
हृदयाला कायमच रहातात

लहानपण दे देवा

आईची अंगाई, काउ चिऊ चा घास हवा
मोठे नाही व्हायचे मला लहानपण दे देवा

casual/ sick लीव्ह नको मला, उन्हाळ्याची सुट्टी हवी
performance presentation नको मला तोंडी परीक्षा हवी
chinese / thai नको मला मऊ भात हवा
मोठे नाही व्हायचे मला लहानपण दे देवा

मोठा flat नको मला रेतीत किल्ला बांधायचा आहे
मोटर गाड़ी नको मला तीन चाकी सायकल हवी आहे
कोट टाय नको मला अर्धी विजार हाफ शर्ट हवा
मोठे नाही व्हायचे मला लहानपण दे देवा

club, pub नाही मला बागेत जायचे आहे
बग्गीजम्पिंग नाही मला घसरगुंडीवर खेलायचे आहे
pepsi / sprite नको मला बर्फाचा गोला हवा
मोठे नाही व्हायचे मला लहानपण दे देवा

रोज संध्याकाळी मी शुभंकरोती म्हानिन
आई बाबांना नमस्कार करून पाढे सुद्धा लिहिन
शहन्या मुला सारखे मोठ्यंचे ऐकिन
तुझ्या कडून मला फक्त एक आशीर्वाद हवा
मोठे नाही व्हायचे मला लहानपण दे देवा .....

प्रेम

माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..
माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते
प्रेमापेक्षाही जास्त आहे..
कसे असु शकते प्रेम
इतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले,
इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,
इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,
इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,
इतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,
इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,
इतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,
इतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे

मी आहेच असा

मी आहेच असा मैत्री करणारा
मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा
प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा
आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावनारा

मी आहेच असा सतत बोलनारा
मित्राना नको ते प्रश्न विचारनारा
प्रश्न विचारुन त्याना सतवनारा
उत्तरे सांग म्हणुन
तगादा लावणारा

मी आहेच असा मस्त जगनारा
सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा
आपल्यातच आपलपन जपनारा
पण इतरांच्या आनंदासाठी
स्वतालाही विसरनारा

मी आहेच असा मनासारख जगनारा
यशाचे शिखर चदताना हाथ देणारा
अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा
सुखाच्या रस्त्यावरून जाताना
आयुष्य सजवनारा

मी आहेच असा सर्वांच ऐकनारा
आई वडील याना देव माननारा
त्यांचावर जास्त विश्वास ठेवणारा
त्यांच्या कोणत्याही निर्णयावर
समाधानी असणारा
मी आहेच असा मैत्री करणारा
मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा
प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा
आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावनारा

मी आहेच असा सतत बोलनारा
मित्राना नको ते प्रश्न विचारनारा
प्रश्न विचारुन त्याना सतवनारा
उत्तरे सांग म्हणुन
तगादा लावणारा

मी आहेच असा मस्त जगनारा
सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा
आपल्यातच आपलपन जपनारा
पण इतरांच्या आनंदासाठी
स्वतालाही विसरनारा

मी आहेच असा मनासारख जगनारा
यशाचे शिखर चदताना हाथ देणारा
अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा
सुखाच्या रस्त्यावरून जाताना
आयुष्य सजवनारा

मी आहेच असा सर्वांच ऐकनारा
आई वडील याना देव माननारा
त्यांचावर जास्त विश्वास ठेवणारा
त्यांच्या कोणत्याही निर्णयावर
समाधानी असणारा

ती एकदा आजीला म्हणाली

मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं......

नेहमीच वाटतं मला

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्या बटांना
मी अलगद सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दुध पाण्यासारखं हे
आपलं प्रेम एकजीव व्हावं


नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माझ्या अन मी तुझ्या
स्वप्नांना बळ द्यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या संगतीनं मग
आपल्या प्रेमाचं पिक बहरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
विस्कटलेल हे घर नी
मन माझं तू सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या ओठावरले ते ' अमृतकण '
माझ्या ओठांनी अलगद टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
सहवासाने तुझ्या मग
माझ्यात बारा हत्तीचं बळ यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माळलेल्या मोग-याने
मग बेधुंद दरवळाव..

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा
तुझ्या डोळ्यात सजवावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चुकलेल्या हुकलेल्या क्षणांना
पुन्हा एकवार जगावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
भारलेल्या या क्षणांना
मी निरंतर जपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझं माझं गुपित तू
नजरेनं उलगडावं.

नेहमीच मला वाटतं
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रत्येक सुखाशी
तुझं नातं असावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
घड्याळाच्या काट्याने मग
त्याच क्षणावर थांबावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या जवळ असण्यानं
माझ्या प्रयत्नाना बळ यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
सोबतीने तुझ्या सखे
प्रेमाचं हे गौरीशंकर गाठावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दिव्यांच्या प्रकाशात
तुझं तेजोमय रूप बघावं

चारोळ्या

चंद्रास सोभते चांदणी
हिर्यास सोभे हिरकणी
तुझी आठवण येते क्षणोक्षणी
म्हणून हातात घेतली लेखणी

जीवनाचे अर्घ्य तुला
तेव्हाचा मी दिले होते
हातामध्ये हात जेव्हा
तुझे मी घेतले होते

तु नाही म्हणालीस तेव्हा
विखरून गेले प्रीतीचे शिंपले
पण तरीही अश्रूचे
का कुणास ठाऊक मोती झाले


तुला चोरुन पाहणं
माझं रोजचं झालं होतं
आज तुला दुसऱ्यासोबत पाहून समजलं
की आपलं घोडं इथंच पाणी प्यायलं होतं

हल्ली मी विचार करतो
खरंच प्रेम मणजे क्या असतं
आजकालचं प्रेम मणजे
फक्‍त अडीच सब्दांचा खेळ असतं

मला तुझं हसन हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे

लोपला तुझं स्पर्श अन्
विरला तो लाडीक इशारा
सोबतीला धगधगता
फक्त्त तुझ्या प्रीतीचा निखारा

तुझे होकारार्थी संकेत
सारे फसवे निघाले
मी फुल पाहत गेलो
काटे कावेबाज निघाले

चेहरा कितीही लपवला तरी
डोळे लपवता येत नाहीत
प्रेम कितीही लपवलं तरी
डोळे ते लपवत नाही

प्रेम करा डोळसपणे
त्यात नको घ्याई
फासुणूक झाली तर
त्याला ग्राहक मंच नाही

भावना

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे कळणार ?
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कसे कळणार ?
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा
काहीतरी देण्यात महत्त्व असतं
कारण मागीतेला स्वार्थ
अन् दिलेलं प्रेम असतं
शब्दांनी कधीतरी माझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती

Sunday, February 27, 2011

!!! जय महाराष्ट्र !!!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !
आमच्या घरा घरात नांदते मराठी !
आमच्या नसानसात दौडते मराठी !
!!! मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!